भाजपच्या खोटारडेपणामुळे महापुजेची परंपरा खंडीत : काॅग्रेसची टीका
मुंबई : सतत जनतेची फसवणूक केल्यामुळे पंढरपुरात होणारी महापुजा रद्द करण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढवली असल्याची टीका काॅग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
मराठा समाजाच्या तीव्र उद्रेकामुळे पंढरपुर मध्ये आषाढी एकादशीला होणा-या महापुजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.त्याच्या या निर्णयाचा काॅग्रेसने समाचार घेतला आहे. सतत जनतेची फसवणूक केल्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर ही नामुष्की ओढवली असून, जुमलेबाजी अंगाशी आली आहे.भाजपच्या खोटारडेपणामुळे आषाढी एकादशीला पंढरपुर मध्ये होणारी विठ्ठलाची शासकीय महापुजा, वर्षोनुवर्षे चालत आलेली परंपरा खंडीत झाली आहे.याचे दु:ख काॅग्रेसला आहे अशी टीका सावंत यांनी ट्विटरद्वारे केली आहे.