मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळेल याची खात्री काय ? 

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळेल याची खात्री काय ? 

राज ठाकरे यांचा सवाल

जालना : मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर सरकार वेळ काढूपणा करत असून, याबाबत कोणताच राजकीय पक्ष खरी स्थिती सांगत नसल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.नोकर भरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. परंतु हे आरक्षण मिळेलच यांची खात्री काय, असा सवाल त्यांनी केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज जालना येथे आले असता त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली.मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार वेळ काढूपणा करत असून,यावर कोणताच राजकीय पक्ष खरी स्थिती सांगत नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.लवकरच होणा-या नोकर भरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळेल असे मुख्यमंत्री सांगत असले तरी हे आरक्षण मिळेलच यांची खात्री काय, असा सवाल त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पंढरपुरात महापूजेवरून निर्माण झालेल्या स्थितीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की,राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपुरात आले आहेत.हा राज्याच्या श्रद्धेचा हा विषय असल्यामुळे त्याला गालबोट लागता कामा नये असेही ते म्हणाले.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

Previous articleविठ्ठल पूजेला विरोध करणारे छत्रपतींचे मावळे होऊच शकत नाही : मुख्यमंत्री
Next articleस्वबळाच्या तयारीला लागा, युतीचा निर्णय पक्ष घेईल!