स्वबळाच्या तयारीला लागा, युतीचा निर्णय पक्ष घेईल!
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज महाराष्ट्र आणि गोव्यातील विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. युती करण्याचा निर्णय पक्ष पातळीवर घेतला जाईल असे सांगतानाच तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
भाजपाध्यक्ष अमित शाह आज मुंबई दौ-यावर आहेत.त्यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट संवाद साधला.यावेळी शहा यांनी भाजप लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा घेतला. पक्षाचे विस्तारक यांच्यावर बूथ रचनेची प्रमुख जबाबदारी असल्याने एक बूथ २५ युथ या सुत्रानुसार नेमणुका करण्यास त्यांनी सांगितल्याचे समजते.