अमित शहांनी घेतली लता मंगेशकर यांची भेट
मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज प्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची ‘संपर्क से समर्थन’ अंतर्गत भेट घेतली आणि सरकारच्या यशस्वी कामगिरीची माहिती दिली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज लता मंगेशकर यांची भेट घेऊन सरकारच्या यशस्वी कामगिरीची माहिती दिली. या भेटीत शहा यांनी त्यांच्याशी विविध विषयांशी चर्चाही केली. गेल्या दौऱ्यात अमित शाह हे लता मंगेशकर यांची भेट घेणार होते. परंतु, काही कारणास्तव त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे अमित शहा यांनी आज त्यांची भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.