मुख्यमंत्र्यांनी वर्षावर केली श्री विठ्ठल आणि रूक्मिणीची महापूजा
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक वर्षा निवासस्थानी आज पहाटे श्री विठ्ठल आणि रूक्मिणीची महापूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलजनांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका उंच फडकत राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी केली.
मराठा समाज आरक्षणावरून सुरू असलेल्या उद्रेकामुळे पंढरपुर येथिल महापूजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक वर्षा निवासस्थानी आज पहाटे श्री विठ्ठल आणि रूक्मिणीची महापूजा केली. त्यांनी शासकीय निवासस्थानी महापूजा करून राज्यातील जनतेच्या सुखी जीवनासाठी विठ्ठल-रुक्मिणीला साकडे घातले. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील (ता. शेणगाव) भगवती या गावातील वर्षा जाधव व अनिल गंगाधर जाधव या शेतकरी दाम्पत्याने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली याचा मला विशेष आनंद असल्याचे फडणवीस सांगितले.