मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक

मुंबई : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी बारा वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलवली आहे. उद्या दुपारी बारा वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात पुढील रणनिती ठरविण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या सोमवारी विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील वर्तमान परिस्थितीवर विचारविनिमय होणार असून, त्यानंतर पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

Previous articleमराठा आरक्षणासाठी कायद्यात दुरूस्ती करून घटनेत तरतूद करा : छगन भुजबळ
Next articleआंदोलकांवरील गुन्हे मागे : मुख्यमंत्री