खा. उदयनराजे भोसले यांची आज “मराठा आरक्षण परिषद”

खा. उदयनराजे भोसले यांची आज “मराठा आरक्षण परिषद”

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची नेमकी दिशा निश्चित करण्यासाठी खा.उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन केले अाहे. या परिषदेले मराठा समाजातील मान्यवर समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक, उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण राज्यांत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन आता एका वेगळ्या वळणावर आले आहे. त्या आंदोलनाची नेमकी दिशा निश्चित करण्यासाठी “मराठा आरक्षण परिषद” आयोजित केली अाहे. या परिषदेसाठी मराठा समाजातील मान्यवर समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक, उपस्थित राहणार असल्याची माहिती खा. भोसले यांनी दिली. या परिषदेनंतर दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत खा. छ.उदयनराजे भोसले महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Previous articleशासकीय अधिकारी आणि कर्मचा-यांना जानेवारी पासून वेतनलाभ
Next articleसातव्या वेतन आयोगाच्या वेतनलाभासह महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार