मुख्यमंत्री आज जनतेशी थेट संवाद साधणार
मुंबई : राज्यात सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन आणि आंदोलनकर्त्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडणार असून, जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी ७.३० वाजता, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून तसेच आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यात तीव्र झालेले मराठा आरक्षण आणि या आंदोलनादरम्यान होत असलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडणार असून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.