पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मराठा मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र माेदी भेट घेवून राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची आणि राज्य सरकारने याबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदी यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली.

राज्यात मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले असतानाही हे वातावरण निवळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचललेल्या पाऊलानंतर आज त्यांनी दिल्लीत जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. सुमारे दिड तासभर झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली. राज्यात सुरू असलेले आंदोलन आणि यावर राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिल्याची समजते.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यातील चर्चेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि भाजप खासदारांची बैठक पार पडली. आंदोलनाबाबत सर्व पोलिस अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांनी पत्र जारी केले आहे. आंदोलनातील गुन्ह्यांची माहिती कळवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून चौकशीनंतर हे गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Previous articleमहिला आणि बालकांसाठी डिजीटल माध्यमे अधिकाधिक सुरक्षीत होण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा
Next articleराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १४ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मिळणार