मल्टीप्लेक्स प्रकरणी पडद्यामागे अर्थपुर्ण बाबी घडल्या का ?

मल्टीप्लेक्स प्रकरणी पडद्यामागे अर्थपुर्ण बाबी घडल्या का ?

धनंजय मुंडे यांचा सवाल

परळी : राज्यातील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्याबाबत सरकारने न्यायालयात घेतलेला यु टर्नचा निर्णय गुढ आणि चमत्कारीक असून, या प्रकरणी पडद्यामागे काही अर्थपुर्ण बाबी घडल्या आहेत का ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात मुंडे यांनी मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मुभा असावी याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी सरकारने मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास अशी कुठलीही बंदी नाही अशी बंदी कोणी करत असेल तर कारवाई करू तसेच १ ऑगस्ट पासून खाद्यपदार्थांच्या किमतीची एकच एम. आर. पी. राहील अशी भूमिका घेतली होती.

मात्र या भूमिकेवरून अचानक यु टर्न घेत सरकारने दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सुरक्षिततेच्या कारणावरून मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदीची भूमिका योग्य असल्याची भूमिका मांडली होती. सरकारच्या या भूमिकेवर मुंडे यांनी एका ट्वीटद्वारे संशय व्यक्त केला असून, सरकारने न्यायालयात घेतलेली यु टर्नची भूमिका गुढ आणि चमत्कारीक आहे. या पडद्यामागे काही अर्थपुर्ण बाबी घडल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला आहे. विमानासारख्या सर्वोच्च सुरक्षा असणार्‍या ठिकाणीही बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नसताना मल्टीप्लेक्समध्ये अशी बंदी घालुन सरकार मल्टीप्लेक्स चालकांना राज्यातील लाखो प्रेक्षकांची लुट करण्याचा उघड परवाना देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोवंडीच्या शाळेत विष बाधेमुळे एका बालीकेचा झालेला मृत्यु आणि अनेक बालिका जखमी होण्याची घटना अतिशय गंभीर आहे. शाळेत दिलेल्या औषधी गोळ्यामधूनच जर बालिकांचे जीव धोक्यात येणार असतील तर याला आरोग्य विभाग जबाबदार असून, या घटनेची चौकशी करून यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे.

Previous articleतपासानंतरच वैभव राऊतचे सनातनशी संबंध आहे की नाही सिद्ध होईल
Next articleमनोहर भिडेला कधीपर्यंत संरक्षण देणार?