असंतुष्ट मराठा नेत्यांनीच आंदोलनादरम्यान हिंसा घडवून आणली

असंतुष्ट मराठा नेत्यांनीच आंदोलनादरम्यान हिंसा घडवून आणली
मुंबई दि. १४ : राज्यातील फडणवीस सरकार मराठा समाजाला न्यायालयात  टिकेल असे आरक्षण देत आहे याची खात्री पटल्यानेच समाजात दुही पेटविण्यासाठी काही असंतुष्ट मराठा नेत्यांनीच आंदोलनादरम्यान हिंसा घडवून आणली असल्याचा  दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांचे नाव न घेता केला आहे.
मराठा मोर्चाच्या शांतीपूर्ण आंदोलनाला प्रतिसाद देत  फडणवीस सरकारने समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. आणि मतांचे राजकारण न करता हेच सरकार आता न्यायालयात कायद्यासमोर टिकेल असे आरक्षण देत आहे याची खात्री पटल्यानेच समाजात दुही पेटविण्यासाठी काही  असंतुष्ट मराठा नेत्यानीच ही हिंसा घडवून आणली आहे. असा दावा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांचे नाव न घेता केला आहे.
लवकरच  न्यायालयाचा निकाल येईल, तेंव्हा दिसेल की हेच सरकार समाजाच्या आरक्षणाची मागणी न्यायपूर्वक सोडवणारे प्रामाणिक सरकार आहे. समाजाचे जे नेते अनेक वर्षापासून स्वत: भले करू शकले नाहीत त्यांना आता शांतीपूर्ण मार्गाने मराठा समाजाला फडणवीस सरकार न्याय देत आहे हे पाहवत नसल्यानेच त्यांनी आंदोलन बदनाम करण्यासाठी कारवाया केल्याचे आता समोर  येत असे तावडे म्हणाले.राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर हिंसक आंदोलने झाली ती मराठा क्रांती मोर्चाकडून केली जात नसून त्यात बाहेरील समाज कंटकांचा हात असल्याचे पुरावे हाती आल्याची माहिती औंरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिक्षणमंत्री  तावडे बोलत होते.
Previous articleराजेश नार्वेकर ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी
Next articleफेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार