मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत आ. प्रवीण दरेकरांची पालिका आयुक्तांसोबत बैठक

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत आ. प्रवीण दरेकरांची पालिका आयुक्तांसोबत बैठक

मुंबई : बोरिवली येथे यूपीएससी, एमपीएससी प्रशिक्षण केंद्र उभारणे, दहिसर टोल नाक्याजवळ सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणे, वन जमिनीवरील रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरविणे, यासह मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी विविध प्रश्नांचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आले.

या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर यांच्या समवेत पालिका उपायुक्त खैरे, नगरसेविका सुनीता यादव, प्रीतम पंडागळे,सुरेखा पाटील,भाजपा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, मंडल अध्यक्ष मोतीभाई देसाई, गौतम पंडागळे, विक्रम चौगले, अविनाश रॉय, संजय घाडी, अमित उतेकर, संजय मोरे, सम्राट कदम आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिनव नगर येथे यूपीएससी एमपीएससी स्टडी सेंटर उभारणे, रहेजा वसाहत कुलुपवाडी येथील बॉटलनेक काढून रास्ता रुंदीकरण, ठाकूर व्हिलेज येथे भूमिगत वाहनतळ, वनजमिनिवरील राहिवाशांना मूलभूत नागरी सुविधा पुरविणे, चेकनाका येथे जकात नाक्याच्या जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे, ठाकूर व्हिलेज येथील ईएसआयएस हॉस्पिटलमध्ये मॅटरनिटी होम उभारणे, दत्तानी जवळून हायवे कनेक्टिव्हिटी, आजी-आजोबा उद्यानमध्ये जेष्ठांसाठी स्वच्छतागृह, अशा मागण्यांचे निवेदन यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी आयुक्तांना दिले.

पालिका आयुक्तांनी तपशीलवार चर्चा करून, हे सर्व प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच कालबद्ध नियोजन करून सर्व प्रश्न सोडण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

Previous articleशरद पवारांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
Next articleराज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर