बलात्काराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालवुन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करावी

बलात्काराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालवुन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करावी

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

सांगली : जत तालुक्यातील शंक गावातील अतिमागास समाजातील एका महाविद्यालयीन मुलीस तिच्या घरातून उचलून नेऊन बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याची अमानुष घटना नुकतीच घडली होती.त्या बळीत मुलीच्या घरी शंक गावात आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट देऊन मयत मुलीच्या शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बळीत मुलीच्या कुटुंबियांना ४ लाख १२ हजार रुपयांचा सांत्वनपर निधीचा धनादेश केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवलेंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे ५० हजार रुपयांचा सांत्वनपर निधी बळीत मुलीच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केले.यावेळी बळीत मुलीचे वडील आणि भाऊ यांनी सांत्वनपर मदतीचा धनादेश स्वीकारला.

बलात्कार करून खून करण्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.अश्या अमानुष घटना रोखण्यासाठी बलात्कार करून खून करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा केली पाहिजे. तसेच बलात्काराच्या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालविले जावेत. अशी मागणी आठवले यांनी आज केली आहे. शंक गावातील बळीत मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यातील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. मात्र याप्रकरणी आणखी आरोपी असण्याची शक्यता असून या बलात्कार आणि खुन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि हा खटला जलदगती न्यायालयात चकविण्याची तसेच गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे.

Previous articleराज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर
Next articleपूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार