पंकजाताई मुंडे आणि महादेव जानकरांचे बहिण भावाचे अतूट नाते !

पंकजाताई मुंडे आणि महादेव जानकरांचे बहिण भावाचे अतूट नाते !

मुंबई : बहिण भावाचे नाते घट्ट करणारा आणि पवित्र समजला जाणारा रक्षाबंधन हा सण राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी पशूसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना राखी बांधून मोठ्या उत्साहात साजरा केला.

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि त्याचे चुलत बंधू विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यातील राजकिय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला परिचयाचा आहे. आज रक्षाबंधनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत असताना राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मानलेले बंधू आणि राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला. आज दुपारी महादेव जानकर यांनी पंकजाताईंच्या राॅयल स्टोन या शासकिय निवासस्थानी जावून बहिण भावाचे अतूट नाते समजला जाणारा सण साजरा केला.

रक्षाबंधन हा सण साजरा केल्या नंतर पंकजाताई यांनी या क्षणाचे फोटो ट्विटरवर प्रसिध्द केली आहेत. माझे आणि पशूसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचे बहिण भावाचे अतूट नाते असे नाते आहे. आज रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त महादेव जानकर यांना राखी बांधून परंपरा आणि संस्कृतीचा सण साजरा केला असे ट्विट पंकजाताईंनी केले आहे.

Previous articleपूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार
Next articleअटक झालेल्यांपैकी एकही सनातनचा साधक नाही