ज्या पक्षाचे जास्त खासदार त्या पक्षाचा पंतप्रधान

ज्या पक्षाचे जास्त खासदार त्या पक्षाचा पंतप्रधान

शरद पवार यांचे सूतोवाच

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीत मध्ये जनताच भाजपाला पर्याय देईल. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीची चिंता नाही.ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान होईल, असे स्पष्ट करीत काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार नाही.असा दावा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. यावेळी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.आगामी लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपाला पर्याय देईल. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीची चिंता नाही.राजकारणात होणा-या बदलाला तयार असणा-या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असे स्पष्ट करीत, ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्या पक्षाचा पंतप्रधान होईल असे सांगून, काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार नाही असा दावाही पवार यांनी केला. राहुल गांधी यांनी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या तर मीच पंतप्रधान होणार असे वक्तव्य केले होते. परंतु त्यांनीच मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचेही म्हटले होते असेही पवार यांनी सांगितले.

सत्तेत असूनही शिवसेना भाजप विरोधात भूमिका घेत आहे तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र असे असताना ही शिवसेना आणि मनसे भाजप विरोधातल्या आघाडी पासून दूरच असल्याचे चित्र आहे.भाजप विरोधात असणाऱ्या पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन पवार यांनी केले. मात्र या आवाहनाला शिवसेना आणि मनसेने प्रतिसाद दिला नाही. केवळ मतदान यंत्राच्या घोळाबाबत काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्यात भाजप विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे . शेतकरी कामगार पक्ष आघाडीसोबत येईल ,पण शिवसेना आणि मनसे सोबत तशी कोणतीही चर्चा झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित आहे. याबाबतचा अंतिम निर्णय आघाडीबाबत स्थापन करण्यात आलेली समिती घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील ही चार सदस्यीय समिती जागा वाटपाबाबत निर्णय घेईल असे पवार यांनी स्पष्ट केले.

जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. कर्जमाफी सारख्या अनेक मागण्या आद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, नीती आयोगाचे म्हणण्यानुसार देशातल्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या सारख्या नेत्यांच्या हत्या दिवसा ढवळ्या होतात, मात्र तपासात कर्नाटक सरकारने जी भूमिका घेतली ती भूमिका महाराष्ट्रात दिसली नाही असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. देशात सर्वत्र मतदान यंत्राच्या शाश्वती बाबत शंका व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाने बैठक बोलावली आहे यात आम्ही आमचे म्हणने मांडू असे ही पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुरोगामी विचारवंताच्या हत्या झाल्या त्या पाहता अशा संघटनांचा हेतू ठिक दिसत नाही. त्यांच्या हत्यांमुळे देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे.त्यामुळे अशा अतिरेकी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी केलीच पाहीजे असे ही पवार म्हणाले.

Previous articleअटक झालेल्यांपैकी एकही सनातनचा साधक नाही
Next articleमागासवर्गीयांवर अन्याय करणारे समांतर आरक्षणाचे परिपत्रक तातडीने रद्द करा