उध्दव ठाकरे भुजबळांना काय म्हणाले ?

उध्दव ठाकरे भुजबळांना काय म्हणाले ?

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या भेटमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या नेत्यांच्या भेटीचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.उध्दव ठाकरे आणि भुजबळ यांच्यातील गप्पांच्या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि भुजबळ यांच्या खाजगीतील गप्पांचा फोटो सध्या समाज माध्यामंवर चांगलाच व्हायरल झाला असल्याने अनेक चर्चांना उधाण आले असतानाच हा फोटो पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचे लग्न सोहळ्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या लग्न सोहळ्याला ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांच्या शेजारी बसलेले भुजबळ आणि दुस-या बाजूला बसलेले खासदार संजय राऊत यांच्यात यावेळी चर्चा रंगली होती. या चर्चांचा तपशील उपलब्ध नसला तरी या नेत्यामधिल सुरू असलेली चर्चा गंभीर असल्याचे या फोटोवरून दिसते त्यामुळे या नेत्याच्या गप्पामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

Previous articleशिवसेना लोकसभेच्या सर्व जागा लढविणार
Next articleवीट भट्टयांसाठी हे आहेत नवे नियम