जामीन मिळाल्यानंतर तीन वर्षानंतर छगन भुजबळ महाराष्ट्र सदन जातात तेव्हा….

जामीन मिळाल्यानंतर तीन वर्षानंतर छगन भुजबळ महाराष्ट्र सदन जातात तेव्हा….

मुंबई : महाराष्ट्र सदन प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ही वास्तू उभारण्यासाठी अथक प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तब्बल तीन वर्षानंतर आज दिल्ली येथिल महाराष्ट्र सदनाला भेट दिली.

माजी उपमुख्यमंत्री, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अथक प्रयत्नातून दिल्लीतील महाराष्ट्र सदन ही वास्तू निर्माण केली. त्यानंतर महाराष्ट्र सदन प्रकरणी त्यांना तुरूंगात जावे लागले.भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर भुजबळ यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भेट दिली.निमित्त होते राष्ट्रवादीच्या विस्तारीत कार्यकारी समितीच्या बैठकीचे. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन येथे भेट दिली. संपूर्ण देशात महाराष्ट्राची शान उंचावणारी सुंदर वास्तू अशी प्रशंसाही भुजबळ यांनी यावेळी केली. त्यांच्यासमवेत माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ , दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष जय भगवान सिंग,झारखंड मधील माजी खासदार भुवनेश्वर महातो,अमित सैनी,समता परिषद व राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleवीट भट्टयांसाठी हे आहेत नवे नियम
Next articleमराठा समाजातील विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करणार