तरूणींनी राम कदमांच्या पुतळ्याला चप्पलने मारून केला निषेध

तरूणींनी राम कदमांच्या पुतळ्याला चप्पलने मारून केला निषेध

इंदापूर : भाजपचे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून इंदापूर मधिल युवा काँग्रेसच्या तरुणींनी आ. कदम यांच्या पुतळ्याला चप्पलांचा मार देवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

भाजपचे आमदार राम कदम यांच्या विधानांनातर इंदापूर मध्ये युवा काँग्रेसच्या तरुणींनी आंदोलन केले.राम कदम यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.या पुतळ्याला रावण कदम नाव देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी तरुणींनी केली. या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांना चप्पल काढून मारावस वाटले इतकी तीव्र प्रतिक्रिया प्रतिक्षा जामदार, मिना कदम,रेखा देवकर या तरुणींनी दिली.या आंदोलनातील तरूणींनी आ. राम कदम यांच्या पुतळ्याला चप्पलने मारून निषेध केला.

Previous article“राम नव्हे रावण” मनसेची पोस्टरबाजी
Next articleराष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या;दाखवला इंगा