एका दिवसासाठी भाजपचे नेते व्हा…मग कळेल !
सावंतवाडी : शिवसेना,आरपीआय, महादेव जानकर यांचा रासप पक्ष आणि सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांना सोबत घेवून कसरत करत सत्तेची चार वर्षे पूर्ण केली. पुढील वर्षही पूर्ण करू असे सांगत,तुम्ही एक दिवसासाठी भाजपाचे नेते व्हा, मग मित्र पक्षांना सोबत घेऊन कसे पुढे जावे लागते हे तुम्हाला कळेल अशी ऑफर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना आज दिली.
गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी कोकणात आहेत.यावेळी चंद्रकांत पाटील यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारण्यात आला असता एक दिवसासाठी भाजपाचे नेते व्हा. शिवसेना, भाजप, आरपीआय, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना सोबत घेवून कसे पुढे जावे लागते हे लक्षात येईल अशी मजेशीर ऑफर त्यांनी पत्रकारांना दिली.