छत्रपती व रायगडच्या नावलौकिकास साजेसं आदर्शवत काम करूया

छत्रपती व रायगडच्या नावलौकिकास साजेसं आदर्शवत काम करूया

आ. प्रवीण दरेकरांचे रायगड बँकेच्या सर्वसाधारण सभेत आवाहन

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो व रायगड हे ऐतिहासिक नाव बँकेला असल्यानेच ती संस्था डबघाईस येऊ नये याकरीता मी स्वतः या बँकेत लक्ष घातले असून छत्रपतींच्या व रायगडच्या नावलौकिकास आदर्शवत ठरेल असे आपण काम करूया, असे आवाहन मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी रा.मि.म.संघाच्या परेल येथील सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले.

वर्षभरात एनपीए कमी करून बँक नफ्यात आणण्याचे काम करत ‘क’ वर्गापासून बँकेला ‘अ’ वर्गात आणण्याचे महत्वाचे काम केले असल्याचे आमदार दरेकर यांनी सांगितले. आरबीआयचे निर्बंध असल्याने रायगड बँकेला कर्जवाटप करता येत नव्हते, ते निर्बंध वर्षभरात नियोजनबध्द कामकाज करून निर्बंध उठवले असून आता बँकेला १० लाखापर्यंत कर्ज देण्याची परवानगी आरबीआयने दिली असल्याचे सांगितले. आर्थिक प्रगतीबरोबरच एटीएम सेवा, बिलपेमेंट, सीबीएस प्रणाली आदी सेवा देण्याचा प्रयत्न झाला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेद्वारे बेरोजगार तरूण-तरूणींना कर्ज देण्याची भूमिका रायगड बँकेने घेतली असल्याचे आमदार प्रविण दरेकर यांनी जाहीर केले.
बँकेचा संचित तोटा कमी करून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पालघर, पुर्व व पश्चिम उपनगरांत आरबीआयची परवानगी घेऊन रायगड बँकेच्या शाखा उघडण्याचा संकल्प असल्याचे आमदार दरेकर यांनी सांगितले. बँकेच्या वर्षभरातील प्रगतीबद्दल उपस्थित सभासदांनी आमदार दरेकरांच्या नेतृत्वाचे जाहीर कौतुक केले व सत्कारही केला. पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या सभासदांना लाभांश देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनही आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार दरेकर यांनी दिले.

यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष राजेश काळे, मुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार पितळे, संचालक सर्वश्री विलास सावंत, जयसिंग भोसले, नितिन बनकर, सिध्दार्थ गमरे, संजय नागरे, अरूण शंकर, दिलीप शिंदे, राजेश पाटील, काशिनाथ इमक, महेंद्र शहा, दिव्या घाडीगावकर, रत्नप्रभा मसुरकर, राजेंद्र चव्हाण, तसेच माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, दत्ता पोंगडे, डी.एस.वडेर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार; राज्याच्या योजनांची राष्ट्रीय पातळीवर दखल
Next articleशांततामय मार्गाने भारत बंद यशस्वी करा! : अशोक चव्हाण