विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ऑक्टोंबरला पोटनिवडणूक

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ऑक्टोंबरला पोटनिवडणूक

मुंबई : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

केंद्रिय निवडणूक आयोगाने आज विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोंबर रोजी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १४ सप्टेंबरला या निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल.२२ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून,२४ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. तर २६ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून,बुधवार दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून, त्याच दिवशी ५ वाजता मतमोजणी करण्यात येईल.फुंडकर यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ २०२० पर्यंत होता.

Previous articleउद्याच्या ‘भारत बंद’ला शिवसेनेचा पाठिंबा नाही
Next articleश्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टपाल तिकीटाचे लोकार्पण