गोरगरीब जनतेला कमी दरात जास्तीत जास्त घरे देण्याचा प्रयत्न

गोरगरीब जनतेला कमी दरात जास्तीत जास्त घरे देण्याचा प्रयत्न

म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत

मुंबई : राज्यातील गोरगरीब जनतेला कमीत कमी दरात जास्तीत जास्त घरे देण्याचा आपला प्रयत्न राहिल असा मानस महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आज व्यक्त केला आहे.

रत्नागिरीचे शिवसेना आमदार उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला,या प्रसंगी खा. विनायक राऊत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्र्वर, मुंबई घरे दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर,शिवसेना खा. अनिल देसाई, आ. मंगेश कुडाळकर, आ. अनिल परब, आ. प्रसाद लाड,आ. राजन साळवी आदी नेते उपस्थित होते.

राज्यातील गोरगरीब जनतेला कमीत कमी दरात जास्तीत जास्त घरे कशी देता येईल असा मानस व्यक्त करीत यासाठी वेळ पडल्यास तज्ञ समिती नेमली जाईल असे महाराष्ट्र म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्रातून कोकणात काही प्रकल्प आणता येतील का यासाठी प्रयत्न करून, कोकणात म्हाडाच्या जागा उपलब्ध नसल्याने त्या जागा कशा उपलब्ध करून देता येईल यावर माझा भर राहणार असल्याचे आ. सामंत म्हणाले. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे.मातोश्री म्हाडाच्या कार्यालयासमोरच असल्याने त्यांना अपेक्षित काम करू दाखवेल असा विश्वासही महाराष्ट्र म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Previous articleबंद  शांततेत पाळल्याने गृहराज्यमंत्र्यांने मानले विरोधकांचे आभार
Next articleखा. डाॅ. प्रितम मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण ; भाजपच्या कार्यकर्त्यांत सर्वत्र संतापाची लाट