मुख्यमंत्र्यांनी घेतले कृपाशंकर सिंह,मिलिंद नार्वेकरांच्या गणपतीचे दर्शन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या यांच्या घरी जाऊन घरगुती गणेशाचे दर्शन घेतले.मुख्यमंत्री दर वर्षी मिलिंद नार्वेकरांची घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतात पण प्रथम त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दर वर्षी गणेशोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेना पक्ष प्रमुख यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतात. त्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काल रात्री नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले.त्यानंतर मुख्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी गणेशाच्या दर्शनासाठी पोहोचले.यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली त्यामुळे पुन्हा एकदा कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशाची चर्चेला सुरुवात झाली आहे.