“डॉल्बी” वाजवणार म्हणजे वाजणारच : खा.उदयनराजे
मुंबई : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डॉल्बीच्या वापरास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असला तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या वापरास मनाई करणारा महत्वपूर्ण निकाल न्यायालयाने आज दिला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले डॉल्बी वापराच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून, कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका घेत गणपतीचे विसर्जन हे मंगळवार तळ्यातच करणार असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असून,
न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे. मी पळपुटा नाही असा इशाराही त्यांनी दिला.