राज्यातील ११ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील ११ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने आज ११ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, संजय सेठी यांची मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर; मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची वैद्यकिय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

डॉ. कविता गुप्ता यांची सीकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तर सध्याचे सीकॉमचे व्यवस्थापकीय संचालक के.एच.गोविंद राज यांची कौशल्य विकास , रोजगार आणि उद्योजगता संचालनालयाच्या आयुक्तपदी (नवी मुंबई ) नियुक्ती करण्यात आली आहे.अनुप कुमार यादव यांची आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनचे आयुक्तपदी तर; परिमल सिंह यांची राज्याचे विशेष विक्री कर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त डॉ. एच यशोद यांची महिला आणि बालविकास पुणे येथे आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार विभागाचे आयुक्त ई रवेंद्रन यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.एम.जे प्रदीप चंद्रन यांची सामान्य प्रशासन विभाग उपसचिव (माहिती-तंत्रज्ञान) म्हणून तर;डॉ. बी. एन. पाटीलः पर्यावरण विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.जात पडताळणी समिती नागपूरचे अध्यक्ष ए. बी धुलज यांची कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous article“डॉल्बी” वाजवणार म्हणजे वाजणारच : खा.उदयनराजे
Next articleशरद पवारांच्या उपस्थितीत १ ऑक्टोबर रोजी बीडला राष्ट्रवादीचा विजय संकल्प मेळावा