अखेर मुहूर्त ठरला; दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार !
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त साडला असून,यंदाच्या दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे भोसरी एआयडीसी प्रकरणी राजीनामा द्यावे लागलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा या विस्तारात समावेश केला जाणार असल्याचे समजते.
सध्या गणेशोत्सव सुरू असून त्यानंतर पितृ-पंधरवडा सुरू होणार असल्याकारणाने येत्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे समजते.कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह भाजप आगामी विस्तारात चार जागी नव्या चेह-यांना संधी देणार आहे.तर ;राज्य सरकारलाही पुढच्या महिन्यात चार वर्ष पूर्ण होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत.त्यामुळे आगामी विस्तारात काहींना नारळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.विशेष म्हणजे भोसरी एमआयडीसी प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना न्यायालयाने दिलासा दिल्याने त्यांची मंत्रिमंडळात वापसी होवू शकते.गेल्याच आठवड्यात खडसे यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेवून चर्चा केली होती. राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने आगामी विस्तारात शिवसेनेकडून सावंत यांच्या जागी कोणाली संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.