आम्ही अजून तव्यापर्यंत गेलोच नाही : शरद पवार
सातारा : फसवाफसवी करू नका, नाहीतर आपल्यालाही कळतं काय करायचं असे थेट आव्हान साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले असता आमच्यामध्ये असे काही बोलणेच झाले नाही असे स्पष्ट करून,आम्ही अजून तव्यापर्यंत गेलोच नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साता-याच्या जागेवरून राष्ट्रवादीत महाभारत सुरू असून, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साता-यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर या भेटीबद्दल पत्रकारांशी बोलताना खा.भोसले म्हणाले की, पवार साहेब मोठे हे व्यक्ती आहेत. आपल्या सगळ्यांना लाज वाटेल इतके काम ते आजही करतात. ये भेटीत मी एवढंच म्हटलं की फसवाफसवी करू नका, नाहीतर आपल्यालाही कळतं काय करायचं. तर आमच्यात असे काही बोलणेच झाले नसल्याचे पवार म्हणाले.उदयनराजेंनी मला भेटीसाठी वेळ मागितली आहे त्यानुसार त्यांची भेट होईल.कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत अजून कसलीही चर्चा झाली नाही.जिल्ह्यात राजेंमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल पवार म्हणाले की,सगळीकडेच समज गैरसमज असतात.त्यावर भाकरी करपली असा प्रश्न केला असता’ मला असे काही वाटत नाही आम्ही अजून तव्यापर्यंत गेलोच नाही असा स्पष्ट करून पवार यांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.