हमीभावासाठी शेतक-यांचे मंत्रालयासमोर आंदोलन
मुंबई : शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव मिळावा या मागणीकरिता आज छावा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वारासमोर तूर, हरभरा, मूग उधळून सरकारचा निषेध केला.
छावा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.दुपारच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळ या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करित तूर, हरभरा, मूग उधळून सरकारचा निषेध केला.या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.