व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ नाही

व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ नाही

मुंबई : राज्यात प्लॅस्टिक बंदी कायम असून यापुढे  व्यापाऱ्यांना प्लस्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार  नाही. प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर  कडक कारवाई करुन राज्यातील प्लॅस्टिक बंदीची मोहिम काटेकोरपणे राबविण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले.

मंत्रालयात राज्यातील प्लॅस्टिक बंदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी पर्यावरण प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे सर्व आधिकारी उपस्थित होते.प्लॅस्टिक बंदी मोहिम सुरु असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वैक्तीक कारवाईची मोहिम सुरु करावी असे ही कदम यांनी यावेळी सांगितले.

Previous article२७ सप्टेंबरला प्रदेश युवक काँग्रेसची राज्यस्तरीय निर्धार बैठक
Next articleनाशिक जिल्ह्यात टंचाई उपाययोजना तात्काळ लागू करा : भुजबळ