युती करायची की नाही याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा : मुनगंटीवार
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : एकला चलोचा नारा देणा-या शिवसेनेपुढे भाजपने आज पुन्हा एकदा युतीसाठी हात पुढे केला आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षात युती व्हावी, त्यासाठी आम्ही तयार असून,आता युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यावा असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगून युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलवला.
भाजपाच्या प्रदेश कार्यकरिणीच्या दोन दिवसीय बैठकीला आज दादर येथील वसंतस्मृती येथे सुरूवात झाली.आज झालेल्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री एकनाथ खडसे,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे.आदी नेते उपस्थित होते. पडली त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीतील झालेल्या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.आम्ही युती साठी तयार आहोत.आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. युती व्हावी ही आमची शेवटपर्यत भूमिका असेल मात्र त्याचा निर्णय शिवसेनेने घ्यायला हवा असे मुनगंटीवार यांनी सांगितले. शिवसेना आणि भाजपची गेली २५ वर्षे युती असल्याचे आमच्या पक्षांचे विचार एकच असल्याने आगामी निवडणूकीत युती व्हावी असे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्ष तयारी लागले असतानाच आता भाजपानेही कंबर कसली आहे.आगामी निवडणूकीसाठी ‘काॅग्रेसचे १५ वर्षे विरुद्ध भाजपची ४ वर्षे’असा नारा असलेली पुस्तिका काढून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सडेतोड उत्तर देणार असल्याचे अर्थमंत्री मुंनगटीवार यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी असत्य वचन करत आहेत त्याला सडेतोड उत्तर आम्ही या माध्यमातून देणार असून, यासाठी आमचे कार्यकर्ते तळागळात पोहोचून लोकांना सत्यस्थिती सांगतील असे मुंनगटीवार म्हणाले.
येत्या महात्मा गांधी जयंतीपासून म्हणजेच २ ते ३० जानेवारीपर्यत महात्मा गांधी सेवा, स्वच्छता आणि संवादच्या माध्यमातून भाजपाच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे.या पदयात्रेत १५० लोक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये ७५ महिला आणि ७५ पुरुष असणार आहेत. तसेच दर १० किलोमीटर वर एक नेता या पदयात्रेचे नेतृत्व करेल असे देखील मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. उद्या गुरूवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात भाजपाची कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली असून, याचे उदघाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून समारोप मुख्यमंत्री फडणवीस करणार आहेत. उद्यापासून लोकसभेचा शंखनाद आम्ही सुरू करणार आहोत असे सांगत विधान सभेच्या २८८ मतदार संघात आमचे कार्यकर्ते आम्ही केलेली कामे लोकांपर्यत पोहोचवणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केवळ स्वतःच्या संस्थाच वाढविण्याचे काम केले . जे स्वतःच्या संस्था वाचवू शकले नाहीत ते राज्य काय चालवणार असा टोला देखील मुनगंटीवार यांनी लगावला.