सिध्दीविनायक मंदिर परिसरातील दुकानांवर पर्यावरणमंत्र्यांची धाड !
मुंबई : श्री सिध्दीविनायक मंदिर परिसरात प्लास्टिकच्या बॅगेतून भाविकांना प्रसाद व फुले देणाऱ्या दुकानदारांवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्वत:हून धाडी टाकून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
श्री सिध्दीविनायक मंदिरात दर्शनासाठी आज पर्यावरण मंत्री गेले असता, मंदिरातील परिसरात काही भाविकांच्या हातामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये प्रसाद, हार व फुले असल्याचे दिसून आले. या संदर्भात भाविकांशी विचारणा केल्यानंतर मंदिर परिसरातील संबंधित दुकानातून या पिशव्या देण्यात आल्याचे भाविकांनी सांगितले. त्या दुकानांची पाहणी केली असता दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या प्लास्टिकचा साठा आढळून आला. त्यानंतर मंत्री कदम यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून दुकानदारांवर कार्यवाही करुन दंड आकारण्याचे निर्देश दिले.