शरद पवार यांनी कुठेही क्लीन चिट दिलेली नाही : भुजबळ
औरंगाबाद : राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुठेही क्लीन चिट दिलेली नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
तारिक अन्वर यांनी दिलेला राजीनामा हा गैरसमजातून दिलेला असावा. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू, असे भुजबळ म्हणाले. क्लीन चिट देण्याचे काम केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असतात, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नावर लगावला. राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीची मागणी करत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या याबाबत शंका उपस्थित केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.