कापडापासून सूत…..राज ठाकरेंचा मोदी शहांवर निशाणा

कापडापासून सूत…..राज ठाकरेंचा मोदी शहांवर निशाणा

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधीजींच्या जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातुन निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केले आहे. आपल्या व्यंगचित्रातून महात्मा गांधीजींच्या जयंती दिनी राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे मोदींना आधुनिक गांधी बनवले आहे. त्यामध्ये, मोदी चरखा चालवत असून ते कापडापासून सूत तयार करत आहेत. विशेष म्हणजे देशातील सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून त्यांच्या अंगावरील कपडे काढून हे सूत बनविण्यात येत असल्याचे व्यंगचित्रात दाखवले आहे. तर देशाची अर्थव्यवस्था आणि विचारवादाचा उडालेला गोंधळ कचऱ्याच्या ढिगासारखा गुंडाळल्याचे त्यांनी व्यंगचित्रातून सूचवले आहे. या व्यंगचित्रात भिंतीवर अडकवलेल्या छायाचित्रातून महात्मा गांधी आश्चर्यपणे मोदींकडे पाहात असल्याचे दाखवले आहे.

Previous articleराष्ट्रवादीचे सरकारविरोधात मौनव्रत आंदोलन सुरू
Next articleमुख्यमंत्र्यांना पहिला धक्का.. आशिष देशमुखांचा आमदारकीचा राजीनामा