केंद्र व राज्य सरकारने सत्य अहिंसा शांती या तत्वांना तिलांजली दिली : अजित पवार
मुंबई : केंद्र व राज्यसरकारने सत्य अहिंसा आणि शांती या महात्मा गांधीजींच्या तत्वांना गेल्या चार वर्षात तिलांजली देण्याचे काम करतानाच सत्याच्या जागी असत्याचा कारभार केला.अहिंसेच्या जागी हिंसा होत असताना गप्प राहण्याची भूमिका घेतली.आणि शांतीच्या जागी आज अशांत वातावरण निर्माण केले आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.
मौनव्रत या आंदोलनाबाबत बोलताना अजित पवार यांनी महात्मा गांधीजींनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाला अनुसरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सकाळी ९ ते १२ यावेळेत फरशीवर बसून धरणे आणि मौनव्रत आंदोलन केले असल्याची माहिती दिली.या आंदोलनादरम्यान काही पोलिस आम्हाला तिथे बसता येणार नाही,वेगळी भूमिका घ्यावी लागेल.त्यावेळी आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. वास्तविक तिथे महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मुख्य सचिव येवून गेले. गृहराज्यमंत्री येवून गेले. यांच्याशिवाय अनेक जण जात येत होते. आम्ही त्यांना अडचण निर्माण केली नाही. त्यामुळे पोलिसांसमोर काय करावे, यांना अटक करावी की नाही अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. परंतु आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला ही वस्तुस्थिती आहे असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादीने केलेले या आंदोलनाबाबत काहींनी काही तरी वक्तव्य केले. अरे ज्यांनी असे वक्तव्य केले त्या निर्लज्ज माणसाला शरम वाटली पाहिजे.आम्ही असे काय केले आहे असा संतप्त सवालही पवार यांनी केला.