अजित पवारांचा मुलगा पार्थ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार ?

अजित पवारांचा मुलगा पार्थ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार ?

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.या निमित्ताने पवार कुटुंबाची तिसरी पिढी निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

आगामी लोकसभा निवडणूकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून, येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येणार आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवर नेत्यांचा कानोसा घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अध्यक्ष शरद पवार उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जावू शकते. गेल्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली होती. राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदार संघ येतात त्यामुळेच पार्थ यांचे नाव पुढे आले आहे.

Previous articleराष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही
Next articleधोबी व्यावसायिकांना सवलतीच्या दरात वीज मिळणार