धोबी व्यावसायिकांना सवलतीच्या दरात वीज मिळणार
मुंबई : धोबी व्यावसायिकांना वाणिज्यिक दराऐवजी कमी दराने वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असून,धोबी सेवांसाठी नवीन वर्गवारी करण्यात येवून त्यांनी कमी दराने म्हणजेच प्रती युनिट ६.०६ दराने वीज देण्यात येणार आहे.या निर्णयामुळे धोबी व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.
धोबी ( लाॅड्री ) व्यावसायिकांना यापूर्वी वाणिज्यिक दराने म्हणजेच ० ते २०० युनिट करिता ७ रूपये २८ पैसे तर २०० पेक्षा अधिक युनिट करिता १० रूपये ५० पैसे प्रती युनिट दर आकारला जात होता.धोबी, परिट समाजाने हे दर कमी करण्याची मागणी केली होती.त्यानुसार महावितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली होती.आयोगाने यावर नुकतेच आदेश पारित केले आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात येवून, धोबी सेवा करिता नविन वर्गवारी लघुदाब अशी केली आहे. त्यांनाव१ सप्टेंबर २०१८ पासून प्रती युनिट ६ रूपये ०६ पैसे असा नविन दर लागू करण्यात आल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.