पेट्रोलनंतर डिझेल चार रुपयांनी स्वस्त होणार !

पेट्रोलनंतर डिझेल चार रुपयांनी स्वस्त होणार !

नाशिक : राज्य सरकारने राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता डिझेलचे दर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.डिझेल प्रति लिटर दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारनेही करात कपात केल्याने राज्यातील पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी झाले. मात्र, डिझेलवरील करात कोणतीही कपात केली नव्हती.आता  डिझेलच्या दरातही कपात करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

केंद्रानंतर राज्य सरकारने पेट्रोलवरील करात कपात केल्याने राज्यात पेट्रोल एकूण पाच रुपयांनी स्वस्त झाले. आता डिझेलचे दर दीड रुपयांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार मिळून डिझेल चार रुपयांनी स्वस्त होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात आज निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

Previous articleराज्य गहाण ठेवू म्हणणारे तुम्ही कोण ? उद्धव ठाकरे
Next articleएमपीएससीच्या ‘त्या’ उमेदवारांना न्याय देण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार