संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा : मनसेची पोस्टरबाजी

संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा : मनसेची पोस्टरबाजी

मुंबई : उत्तर भारतीय लोक मुंबई आणि महाराष्ट्र चालवतात त्यामुळे त्यांनी मनात आणले तर महाराष्ट्र ठप्प होईल, असे वक्तव्य करणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत  संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असून, केवळ परप्रांतीय मतांवर डोळा ठेवत ते अशी विधाने करत आहेत, अशी पोस्टरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे.

काल नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी उत्तर भारतीय लोक मुंबई चालवतात, त्यांनी मनात आणले तर महाराष्ट्र ठप्प होईल,वक्तव्य केले होते. उत्तर भारतीय लोक राज्यातील सर्वच क्षेत्रात सक्रीय असल्याने हेच लोक मुंबई चालवतात असे वक्तव्य त्यांनी केले होथे. त्याचा समाचार मनसेने घेतला आहे.या वक्तव्याविरोधात त्यांनी समाज माध्यमांवर निरूपम यांचे पोस्टर व्हायरल केले आहे.संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे.

Previous articleचर्मकार कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी वाय. सी. पवार
Next articleदारू दुकानचा परवाना स्थलांतरीत करण्यासाठी एक किलो मीटरची अट