पंकजा मुंडे यांनी अस्मिता, प्रधानमंत्री आवास आणि अतिक्रमण नियमानुकूल योजनांचा घेतला आढावा

पंकजा मुंडे यांनी अस्मिता, प्रधानमंत्री आवास आणि अतिक्रमण नियमानुकूल योजनांचा घेतला आढावा

मुंबई : ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज त्यांच्या मंत्रालयीन दालनात अस्मिता, प्रधानमंत्री आवास आणि अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला आणि या तीनही योजनांचे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

मंत्री मुंडे म्हणाल्या की, राज्यात अस्मिता योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. परंतु ती अधिक गतीने करणे गरजेचे असून शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ देण्याकरीता संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेची २.५ लाख घरांचा गृहप्रवेश कार्यक्रम दि.१९ ऑक्टोबर रोजी प्रतपंधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथून होणार आहे. त्यामुळे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच लाभार्थ्यांना पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. संवाद साधण्याची तांत्रिक नियोजन पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मंत्री मुंडे यांनी दिल्या.

सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी अतिक्रमण नियमानुकूल संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली असून सद्यस्थितीत या प्रणालीवर अतिक्रमणधारकांची नोंदणी सुरु असून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी करावी तसेच दिलेले उद्दिष्टही पूर्ण करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleदारू दुकानचा परवाना स्थलांतरीत करण्यासाठी एक किलो मीटरची अट
Next articleयेत्या शनिवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?