…तर शिवसेना माझ्यासाठी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडेल: आठवले

…तर शिवसेना माझ्यासाठी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडेल: आठवले

पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेना भाजपची युती झाल्यास दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ शिवसेना माझ्यासाठी सोडेल असा विश्वास या लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

आपण दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याचा पुनरूच्चार केला आहे. दक्षिण मध्य मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. लोकसभा निवडणूकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यास शिवसेना ही जागा माझ्यासाठी सोडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. युती झाल्यास दक्षिण मध्य मुंबई आणि सातारा या दोन जागा रिपाइंसाठी सोडाव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीने सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट नाकारल्यास आम्ही त्यांना उमेदवारी देऊ, यासंदर्भात लवकरच खा. उदयनराजे भोसलेंशी बोलणार आहे असे आठवले म्हणाले.

Previous articleधनगर आरक्षणासाठी टीस च्या अहवालाची गरजच काय ? धनंजय मुंडे 
Next articleराज्यात ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी नाही : बावनकुळे