हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी कोणालाही फोन केले नाही

हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी कोणालाही फोन केले नाही

भाजपा आमदार प्रवीण दरेकर

मुंबई: मुंबई डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीसाठी कोणालाही फोन केले नाहीत असा खुलासा भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. सोसायटीच्या निवडणूकीसाठी मुख्यमंत्र्यांचे फोन जातात अशी टीका आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर खुलासा करताना भाजप आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण संस्थांसाठी सरकारच्या माध्यमातून, संस्थांच्या निवडणुका फेडरेशन ऐवजी संस्था स्तरावर घेणे, पुनर्विकासात वाढीव आकाराचे घर देणे, डीम्ड कन्व्हेन्स अशा अनेक योजना जाहीर केल्या. तसेच सहकार कायद्यात गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र तरतुदी करण्याचा महत्वाचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस सरकारने घेतला आहे. गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले.

सरकारच्या या निर्णयांमुळेच मुंबईतील गृहनिर्माण संस्थांनी सहकार पॅनेलला घवघवीत यश मिळवून दिले. मुख्यमंत्र्यांचे काम, गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांच्यावर असणारा विश्वास, तसेच त्यांची प्रतिमा व प्रतिभा यामुळेच भाजपा प्रणित सहकार पॅनेलला२१ पैकी २१ जागा जिंकता आल्या. तर शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे शिवाजी पार्क येथील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी फोन केले, या बोलण्यात तथ्य नसल्याचा खुलासा भाजपा आमदार व या निवडणुका ज्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या त्या आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Previous article…..नाही तर आम्ही राम मंदिर बांधू : उद्धव ठाकरे
Next article“श्रद्धा असू द्या, सबूरी ठेवा” पंतप्रधानांनी साधला मराठीत संवाद