हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार

हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार

गुरुनानक जयंती दिवशीही कामकाज चालणार

मुंबई : येत्या १९ नोव्हेंबर पासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज १९ ते ३० नोव्हेंबर या कार्यकाळात चालणार आहे. शुक्रवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असून,या दिवशीही कामकाज सुरूच राहणार आहे.तर अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Previous articleराज्यातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर
Next articleचर्चा टाळण्यासाठीच दोन आठवड्याचे अधिवेशन !: विखे पाटील