सरकार दुष्काळ जाहीर करण्याची तारीख विसरले का?

सरकार दुष्काळ जाहीर करण्याची तारीख विसरले का?

पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला

औरंगाबाद: सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आनंदात सरकार दुष्काळ जाहीर करण्याची तारीख विसरले का, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दुष्काळ संहितेनुसार जमिनीतील ओलावा, हिरवळ वगैरेंचा अभ्यास करुन ३० ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करणे आवश्यक होते. त्यामुळे केंद्राकडून अधिक मदत मिळाली असती. पण सरकारने तसे काहीच केले नाही. अधिवेशनात या प्रश्नावर कॉंग्रेस सरकारला धारेवर धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.जायकवाडी पाणी प्रकरणावरुन जिल्ह्याजिल्ह्यात निर्माण झालेले वाद पाहता पाटबंधारे महामंडळे बरखास्त करण्याची सूचना चव्हाण यांनी केली. त्याऐवजी नदीखोरे अभिकरण स्थापन करावे, असे सुचवले.

दरम्यान, जायकवाडीला पाणी देण्यास विरोध करणारी याचिका विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने कॉंग्रेसची चांगलीच कोंडी झाली.कॉंग्रेस नेत्यांना शेतकरी आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. विखे पाटलांची भूमिका पक्षाची आहे का, असे विचारल्यावर नेते निरुत्तर झाले.

Previous articleराज ठाकरे पुन्हा नाशिककरांना घालणार साद
Next articleराम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करु :रा. स्व. संघाचा इशारा