जनतेच्या हितासाठी सत्ता कुणाचीही असली तरी पाठिंबा देऊ
उद्घव ठाकरेंनी दिले युतीचे संकेत
नाशिक: गेल्या अनेक महिन्यापासून भाजपवर जोरदार टीका करणारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे आणि महसुलमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील एकाच व्यासपीठावर आले. यावेळी ठाकरे यांच्या भाषणाचा सूर युतीचे संकेत देणारा होता. ठाकरे म्हणाले की, सत्ता कुणाचीही असो, पण जनतेच्या हितासाठी आम्ही पाठिंबा देऊ, असे ठाकरे म्हणाले. तसंच आम्ही सत्तेत राहून भाजपवर टीका कशी करतात, असे मला विचारतात. पण मी सरकारवर टीका करत नाही. मी फक्त जनतेच्या बाजूने बोलतो.
शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या मतदारसंघातील तीनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाचन करण्यासाठी आज पिंपळगाव येथे ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकाच व्यासपीठावर आले. यामुळे राजकीय वर्तुळाला धक्काच बसला. सामोपचाराचा सूर लावताना ठाकरे म्हणाले की, सरकारविरोधात आम्ही नाही तर जनतेच्या बाजूने आहोत, असं सांगताना उद्घव ठाकरे यांचा नेहमीचा वरच्या पट्टीतील सूर आज गायब होता. यावेळी त्यांनी सरकारला अनेक विधायक सूचनाही केल्या.
भाजप शिवसेना तणावावर मिश्कील टिप्पणी करताना ठाकरे म्हणाले की, सरकारच्या चांगल्या कामांमध्ये आम्ही कधीच खोडा घातलेला नाही. राममंदिराच्या भूमीपूजनासाठी एकत्र येऊ या, असेही ते म्हणाले.