पुणे नगर नाशिक सातारा भागात पावसाची शक्यता

पुणे नगर नाशिक सातारा भागात पावसाची शक्यता

मुंबई : कर्नाटक जवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उद्या ४ आणि परवा ५ नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या हवामानाच्या स्थितीचा काही परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल परंतु या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक व चांगल्या पावसाची शक्यता नाही. या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम-विदर्भात आभाळी वातावरण दिसून येईल. या स्थितीमुळे किमान तापमानात वाढ होईल आणि हवेतील गारवा कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

Previous articleराजकारण्यांनी पूर्ण करता येत असतील तीच आश्वासने द्यावीत :श्रीमंत छत्रपती शाहू महाराज 
Next articleग्रामीण बचतगटांच्या महिलांची बाॅस्टनच्या हाॅवर्ड विद्यापीठाला भेट