ग्रामीण बचतगटांच्या महिलांची बाॅस्टनच्या हाॅवर्ड विद्यापीठाला भेट
भारतीय उत्पादने पाहून प्राध्यापकांनी केले कौतुक
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या बचत गटांच्या महिलांनी अमेरिकेच्या बॉस्टन येथील हॉवर्ड विद्यापीठाला आज भेट दिली. यावेळी बचत गटाची उत्पादने पाहून हॉवर्डच्या प्राध्यापकांनी त्यांचे कौतूक केले.
हॉवर्डच्या सहयोगी प्रा. सोन्या सूटर आणि एमिली मायर, सह. संचालक, प्रशिक्षण आणि धोरण यांच्याशी बचत गटांना वित्तीय साह्य तसेच वित्तीय साक्षरता देण्यासाठी प्रशिक्षण देण्यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी यावेळी चर्चा केली. उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी अभियानाची माहिती दिली. यावेळी फिक्कीचे प्रतिनिधी निखिल अग्रवाल, रुबाब सूद उपस्थित होते.