रात्रीच्या अंधारात उंदरांनाही बळ येते : उद्धव ठाकरे
मुंबई:अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार मारल्याच्या मुद्यावर शिवसेनेने पुन्हा भाजपला टोला लगावला आहे. वाघिणीला नरभक्षक ठरवून तिला ठार करण्यात आले. रात्रीच्या अंधारात उंदरांनाही बळ येते, या शब्दांत शिवसेनेने सामना अग्रलेखातूनलसरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात माणसं उपासमार, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, सरकारी अनास्था यामुळे रोज मरत आहेत. पण यासाठी व्यवस्थेला कुणी नरभक्षक ठरवत नाहीत, अशी जळजळीत टीका सेनेने केली आहे.एरवी भाजपचे राज्यकर्ते घर घर, शौचालय अशा घोषणांचे ढोल पिटत असतात. पण वन्य प्राण्यांच्या सावटात जगणाऱ्यांना हक्काचे सुरक्षित घर नाही। म्हणून अवनीसारखी प्रकरणे घडतात, अशा शब्दांत सेनेने भाजपच्या सर्वांसाठी घर योजनेची खिल्ली उडवली आहे.केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वाघिणीला ठार करणारे शआफत खान यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगत वनमंत्री मुनगंटीवार यांना लक्ष्य केले. पण आरोप करणारे आणि आरोपी राज्य सरकार एकाच पक्षाचे आहेत. त्यामुळे खुलासा सरकारनेच करायचा आहे, असे सेनेने म्हटले आहे.
यवतमाळमध्ये कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक शेतकरी कीटकनाशकांमुळे बळी गेले। त्यातील गुन्हेगारांना कुणी अवनीप्रमाणे शिक्षा दिल्याचे दिसले नाही. ज्या राज्यात माणसंही नीट जगू शकत नाहीत तिथे तुझ्यासारख्या वन्य प्राण्यांचे काय अशी खोचक टीका सामना तून करण्यात आली आहे.