वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती गठीत

वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती गठीत

मुंबई : अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.या प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.

अवनी वाघिण मृत्यू प्रकरणी चौफेर टिकेची झोड उठली असतानाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य बिलाल , वन्यजीव संवर्धन ट्रस्ट चे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील . सदर समिती टी 1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.

Previous articleधनंजय मुंडेंनी साजरी केली वृध्दाश्रमात दिवाळी
Next articleमग ह्या पापाचे धनी तुम्ही होणार का ? : उद्धव ठाकरे