शिवसेनेशी युती होणारच ! रावसाहेब दानवे यांचा दावा

शिवसेनेशी युती होणारच ! रावसाहेब दानवे यांचा दावा

ठाणे:समविचारी पक्षांना एकत्र घेऊनच आगामी निवडणूक लढवण्याचे भाजपने ठरवले आहे, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेशी युती करणार असल्याचे संकेत दिले. राम मंदिराच्या मुद्यावर भाजपचे शिवसेनेला समर्थन असल्याचेही ते म्हणाले. भाजप युतीसाठी शिवसेनेकडे आग्रह धरत असला तरी शिवसेना त्यांचा हा आग्रह मानणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

दानवे आज ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी आले होते. ठाणे कल्याण भाजपचा बालेकिल्ला असून येथे भाजपची ताकद आणखी वाढवण्यावर लक्ष देऊ, असे ते म्हणाले. समृद्घी महामार्गाला कुणाचे नाव द्यायचे यावर भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते सामोपचाराने मार्ग काढतील, असे दानवे यांनी सांगितले. समृद्घी महामार्गाला भाजपने माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे तर शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, असा आग्रह धरला आहे.

Previous articleउद्धव ठाकरेंची हिंदीची शिकवणी सुरु
Next articleमी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही:सुधीर मुनगंटीवार