अशोक चव्हाण लोकसभा ऐवजी विधानसभा लढवणार ?

अशोक चव्हाण लोकसभा ऐवजी विधानसभा लढवणार ?

मुंबई: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणुकीनंतर पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असू शकतात. यामुळेच ते लोकसभा ऐवजी विधानसभेती निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होईल असा दावा कॉंग्रेसने केला आहे.

जनसंघर्ष यात्रेपासूनच अशोक चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण हेच पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात. मोदी लाटेतही चव्हाण यांनी आपली नांदेडची जागा राखली होती.राज्यात सध्या युती सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. दुष्काळी स्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, नोटबंदी, जीएसटी यामुळे सर्व वर्ग नाराज आहे. याचा जोरदार फटका युतीला बसेल असा दावा विरोधकांनी केला आहे. त्यामुळे सत्तांतर झाल्यास चव्हाण हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, असे मानले जाते.

Previous articleगुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढण्याची कॅांग्रेसची मागणी
Next articleयंदा विलास मुत्तेमवारांचा पत्ता कट ?